भयानक रात्र भाग १
आम्ही सर्व मैत्रिणिनी बाहेर जाण्याचं ठरवलं .पण त्या दिवशी नेमकी आमावस्या होती, आईने बाहेर जाण्यास सक्त नकार दिला पण तिला न जुमानता बाहेर जाण्यास वडिलांकडून परवानगी मागितली आनि बाहेर फिरायला जायचं ठरलं पण कुठे जायचे हा मोठा प्रश्नच होता .तेव्हाच एका मैत्रिणीने एका भयानक जागेच नाव सुचवल त्या जागेच नाव काळा घाट सर्व जणांनी विचारलं की अस काय आहे या घाटावर तर ती म्हणाली अस म्हणतात की तिथे भुतांचा सहवास आहे . अर्धे जण घाबरले होते पण अर्धे जण तिथे जायला फार उत्सुक होते नको , हो करता करता रात्री तिकडे जायच ठरलं आम्ही सकाळी तिथे जायला निघालो किमान रात्री साडे आठ वाजता तिथे पोहोचलो तिथे भयानक अशी झाडी होती आम्ही तिकडे राहावयास एक जागा शोधली तिकडे एक छोटं घर होत तिकडे आम्ही चार ते पाच दिवस राहायचं ठरवलं