का मी असा ?
प्रत्तेक माणसाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो.काही लोक खंबीर असतात तर काही लोक हळवी त्यांचं मन देखील खूप हळव असत.अगदी कोणी मोठ्या आवाजात बोललं किंवा टोचून बोललं कि लगेच ते त्यांच्या मनाला लागत आणि त्यांचं मन उदास होत.आणि लगेच विचार करत बसतात कि का बरं असं होत असेल आपल्यासोबत? पण खंबीर मनाची लोक असतात त्यांना अश्या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही ते कोणी बोलले कि लगेच उत्तर देऊन मोकळे होतात मग हे खंबीर मनाचे जे असतात ते निर्दयी असतात का बरं ?? तर नाही ते फक्त या गोष्टी मनाला लावून न घेता पुढे जातात पण माझ्याबाबतीत नाही तसं .
प्रत्तेकाला मी चांगल्या मनाने बोलतो,प्रत्येकासोबत प्रेमाने वागतो ; नाही आवडत मला कोणाला दुःखावायला पण मला कोणी मोठ्या आवाजात बोललं किंवा माझं मन दुखावलं तर लगेच उदास होऊन का बोललं असावं याचा विचार करत बसतो न वाटत का माझ्यासोबतच असं होत का मी असा ? कारण मी अश्या छोट्या-छोट्या गोष्टींना जास्त महत्व देत बसतो आणि त्यामुळे दुखावतो.खूप जण बोलले स्वभाव बदल पण ते म्हणतात ना
"स्वभावाला औषध नसतं "हे मात्र तितकंच खरं
माझ्यासारखे असतील का बरं आणखी काही लोक ? का मी एकटाच असा आहे ? असतील तर त्यांना हि असाच वाटत असावं हो ना ? प्रयत्न करील नक्की मी खंबीर होण्याचा पण वाटत एकच प्रत्येकानेच दुसऱ्याच मन जपून वागावं आपल्या काही बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनला काय वाटत याचा देखील विचार करावा कारण प्रत्येकजण खंबीर मानाचे नसतात.
✍️शिवराज जाधव पाटील