Get it on Google Play
Download on the App Store

मी का सिंगल आहे ?

     जकाल प्रत्येकजण बोलतो मी सिंगल आहे,मला कोणी गर्लफ्रेंड नाही ,कोणती मुलगी भावचं देत नाही,सगळ्यांना गर्लफ्रेंड आहे मलाच का नाही मग एक प्रश्न पडतो मी का सिंगल आहे ?सिंगल असल्याने नेमका काय होत बरं?जेवण जात नाही का माणूस जिवंत राहू शकत नाही ? जो सिंगल नाही किंवा ज्याला गर्लफ्रेंड आहे त्याला असा काय मिळालं ? का तो महान झाला असं आहे का ? नाही ना ! मग का हवी असते गर्लफ्रेंड ?? तुम्ही म्हणाल प्रेम असतं अमुक असतं तमुक असतं; प्रेम नक्की काय असतं हे माहिती तरी आहे का कोणाला ? आजकाल कशाला प्रेम म्हणतात हे चांगलंच ठाऊक आहे आपल्याला आणि त्यासाठीच गर्लफ्रेंड हवी असते सगळ्यांना. स्वतःच्या मनाला एक प्रश्न नक्की विचार खरंच तुम्हाला प्रेम कळत का ? आणि जे तुम्ही करता ते प्रेम आहे कि आणखी काही ? असो
        ज्या वयात शिक्षण घ्यायला पाहिजे आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायला पाहिजे त्या वयात आपण हे असे नको ते उद्योग करत असतो . आपले आईवडील कष्ट करून आपल्याला पैसे पाठवतात शिकवतात तुम्ही काही तरी मोठं व्हावं असं स्वप्न देखील बघतात न आपण काय करतो तर हे असले रिकामे उद्योग. नाही गरज या सगळ्याची हे का नाही कळत आपल्याला. गर्लफ्रेंड नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा ते काम येईल.प्रेमाच पावित्र्य आता उरलेलं नाहीये हे लक्षात घेतलं पाहिजे.म्हणून अश्या फालतू गोष्टींपासून होईल तेवढं दूर राहा यात आपलं जीवन वाया घालवू नका.
          आजकाल असं बघायला मिळतंय वर्ग ५वी  ते ९वी तील लहान मुलं मला गर्लफ्रेंड आहे ,माझं ब्रेकअप झालं ,माझं मन तोडलं असं बोलत असतात.एवढ्या छोट्या वयात हि मुलं हे कुठून शिकली असतील . त्यांचं वय सुद्धा नाही अश्या गोष्टी समजण्याचं हे असं कशामुळे होत असावं बरं ? तर हे सगळे लवकर मोठे होण्याचे परिणाम आहेत मी आता मोठा झालो / झाली आता आम्ही हे सगळं करू शकतो असा समज या लहान मुलांचा झालाय. दोष त्यांचा नाही दोष आहे तो समाजात काय घडतंय याचा घराबाहेर पडताच आपल्याला दिसत मुलं -मुली सोबत बसलेले नको ते करत , सोबत फिरणारे हे सगळं हि लहान मुलं  बघतात आणि त्यांचं ते अनुकरण करत असतात.चित्रपट ,मालिका ,गाणी यातील सगळं काही हि मुलं बघतात आणि नकळत या सगळ्यांचा परिणाम यांच्या बाल मनावर होतो आणि मग असं शिकतात.मान्य आहे वयवर्षे १६ ,१७ या वयात असं होणं नैसर्गिक आहे पण या मुलांचं काय जे ५वी ६वी  मध्ये आहेत त्यांच्यात पण असे नैसर्गिक बदल होत आहेत का? असा प्रश्न पडतो.
             ज्या गोष्टींची गरज नाही त्या गोष्टींसाठी आपलं सुंदर जीवन वाया घालवू नका मुळात हे सगळं करून मिळत तरी काय आणि मला सांगा आज जे लोक प्रेम प्रेम बोलतात ,करतात का हो लग्न हे मग ? नाही ना मग का आपण इथेच येऊन अडकतो. विनंती आहे माझी अश्या लोकांना कि यामध्ये न पडता आपल्या आईवडिलांची जाणीव ठेऊन नीट अभ्यास करा. प्रेम करायला तुमचे आईवडील आहेत त्यांच्यावर करा आणि का मी सिंगल आहे याचा विचार करू नका उलट असा विचार करा चांगलं आहे मी सिंगल आहे आणि खुश राहा.

✍️शिवराज जाधव पाटील