भाग - 15
श्री घरी आला आशुतोष कडून जेवण केलचं होतं त्याने त्याला वाटलं ऋतुजाला कॉल करावा
पण रात्री त्यांनी तिला कॉल नव्हता केला बेडवर येऊन श्री लवडला ... मँसेज रीग वाजली
हं आता कुणाचा मँसेज असावा म्हणून त्याने फोन हातात घेतला हे समजून की ऋतुजाचा मँसेज असावा
पण ऋतुजा मँसेज नसून आशुतोषचा मँसेज होता ," गुड नाईट मेरे यार ..."
आशुतोषलाही त्याने गुडनाईट म्हणून रिपले केला ....
ही ऋतुजा मला आता स्वतःहून मँसेज करणारचं नाही का ? राग आला असावा तिला आपला
मी स्वतः च मँसजे करतो म्हणून तिला त्याने Hii चा मँसेज केला ... ती झोपली नव्हतीच तिनेही त्याने
hii म्हटलं म्हणून hii असाचं मँसेज केला ... श्रीला वाटलं आता तरी खुप रागवली आहे आपल्यावर
मँसेज वर नाहीच ऐकणार म्हणून तो तिला एक मँसेज करतो .... मी तुला कॉल करतो रिसिव्ह कर कोणी
असतील आजुबाजूला तर बोलू नको फक्त ऐक ... आणि मँसेज सेन्ड करून तिला कॉल करतो .
" ऋतुजा आय ल्व यु सो मच आजसे नही पुरे १४साल से ..." बापरे !
त्याचा तोंडून आय ल्व यू शब्द ऐकून ऋतुजा तर एवढी आनंदीत झाली .... तिला हा आनंद कसा
व्यक्त करावं सुचतं नव्हतं ... " म्हणजे श्री तू माझ्यावर चौदा वर्षा पासून कसा प्रेम करतो रे ? "
श्री ने तिच्या नकळत तिच्या स्कूल लाईफ पासून प्रेम केलं आजही तो तिच्यावरच प्रेम करायचा ....
तिला हे जरा उशिराच समजलं .
" अगं ऋतुजा मी पाचवी सहावीपासूनच तुझ्या प्रेमात होतो तुला चोरून बघायचो वर्गात .... पण मी
तुझ्यावर प्रेम करतो हे सांगायची हिंमत नाही झाली आणि तेव्हापासून माझ्या ह्रदयात तुझीच जागा आहे
. " हसतच ऋतुजा त्याला म्हणाली ,
" ओहहहह छुपे रूसतम निकले आप तो इतने दिनोसे चोरी छुपे हमे देखते आये ... क्या बात है ! "
" बस करो ना यार अभी कल मिलते है ! "
" आय ल्व यू टू श्री ... थँक्यू सो मच यार !"
श्री ने विचारलं " थँक्स कशासाठी ? "
ऋतुजा हसतच म्हणाली ,
" प्रपोजल एक्सेप्ट केलं त्यासाठी ....." आणि फोन कट केला तिने ....
श्री ही गालातच हसला ...