Get it on Google Play
Download on the App Store

भाग - 10

श्री च्या मनात अनेक प्रश्न बाहेर सोसाट्याच चक्री वादळ इथे श्री च्या मनात प्रश्नाचे

चक्रव्यूह .....

" हँलो ..... कोण ? "

आशुतोषला नवीन नंबर दिसला ... तसं श्रीने ही जाणून त्याच्या नविन नंबर वरूनच कॉल केला होता .

" आशु प्लीज यार मला तुझ्या सोबत खुप म्हत्त्वाचं बोलायचं आहे ....

फोन कट नको करू माझं ऐकून घे ! "

आशुतोषला श्रीचा आवाज ओळखीचा वाटला .... बोलावसं त्याला वाटतं तर नव्हत

तरी तो ऐकून घ्यायला सहा वर्षा नंतर आज तयार झाला होता ...

" हं बोल ...."

श्री ला वाटतं होतं इथून पुढे बोलताना ह्याचे शब्द आपल्याला विकत घ्यावं लागतील .

" ओळखलं ना मला ? "

श्री ने आशुतोषला प्रश्न केला .....

" हो , तुला कोण विसरेल ....."

आशुतोषच्या बोलण्यातून श्री ला त्याच्यावर असलेला आशुतोषचा राग जाणवत होताच ...

" आशु अरे त्या दिवशी तुला जी चिठ्ठी आराध्याने दाखवली ती मी नव्हती लिहीली तिला ती तर यार

परागने लिहीली होती तिला ... हव तर तू आराध्याला विचारून घे पराग पण तुला भेटण्याचा प्रयत्न

करतो आहे ... त्या दिवशी तू माझ्यावर दोषारोपन करतं काहीच ऐकून न घेता निघून गेला ..."

आशुतोषला आता खरं कळलं होत पण काय बोलावं सुचत नव्हतं त्या दोन वर्षात श्री त्याचा बेस्ट फ्रेन्ड

झाला होता आणि त्याची ताटातुट ही तशीच झाली ....

" श्री , अरे ती चिठ्ठी तू नेऊन दिली होती ना आराध्याला म्हणून तिने तुझं नाव सांगितलं आणि खाली

नावं नव्हतचं कुणाचं .... आणि श्री आराध्या नाही आहे ...."

आशुतोषच बोलणं जरा श्रीला बुचकाड्यात पाडत होतं ...

" आराध्या नाही आहे म्हणजे आशु ?? "

श्री चा कातर स्वर अंगावर थरकाप देत होता ... त्याला आराध्याच्या मृत्यु बद्दलची कल्पना नव्हतीच ..

" श्री अरे सहा वर्षा आधीच मी ज्या आराध्यावर प्रेम करायचो ती आराध्या ......"

आशुतोष बोलताना मधातच थांबला .... त्याचा डोळयातून घळघळा अश्रू वहात होते ..

आजपर्यत तो स्वतः लाच सांगत आला आपली आराध्या हे जग सोडून गेली पण कोणत्याच जवळच्या

किंवा दुरच्या मित्राने त्याच्या दुखी रहाण्याचे कारण त्याला विचारले नाही . आणि आराध्या बद्दल तर

आशुतोषच्या त्याचं रूममेटस ला माहिती होते ... आज सहा वर्षानंतर आराध्याचं नावं त्याच्या ओठून

एका मित्राजवळ निघत होतं .....

" आशुतोष अरे काय झालं ?? "

" श्री अरे आराध्याला गर्भाशयाचा कर्करोग झाला होता ... आणि त्याच तिचे निधन झाले ! "

आता श्रीला काय चालयं कळू नाही लागले .....

आयुष्य म्हणजे बंद डायरी का ? 📙 वाचताच क्षणी एकएक रहस्याचा उलगडा होतं जावी अशी ...

" अरे आशु परागने काही वेळा पुर्वी आराध्याला स्वतः च्या डोळ्याने पाहिले .... तो खोटा तर नाही ना

बोलू शकतं .... "

आता आशुतोष मात्र चिडलाच श्री वर ...

" बे श्री किती मुर्ख आहेस तू त्याचावर विश्वास नको ठेऊ मी स्वतः माझ्या

डोळ्यासमोर आराध्याला जळताना बघितलं ....'

श्रीची ही आता जमतिच घालमेल झाली तो आशुतोषला म्हणाला , " मी आज दीडच्या फलाईटने

दिल्लीला निघतो तू येणार सोबत ?? हा पराग किती खरं बोलतो आणि किती खोट ते तिथे गेल्यावरच

माहिती होईल .... आणि सोबत तुझं माझ्यासोबत एवढे दिवस न बोलण्याचं प्रण ... ती चिठ्ठी कोणाची

होती ह्याचा उलगडाही होईल .... चलणार का ? "

" नाही तू जा माझी आराध्या नाही आहे .... त्या परागवर मी कसा विश्वास ठेऊ ?? "

" त्याच्यावर विश्वास नको ठेऊ . पण , तुला असं वाटतं का तू एवढे वर्ष झाली माझ्या सोबत बोलला

नाही म्हणून आपली बोडींग तुटली .... मी आजही तुला बेस्ट फ्रेन्डच समजतो . यार झाल्या काही चुका

माझ्याही हातून पण तू ऐकायलाही तयार नव्हता आता माझ्यासाठी चल ! "

आशुतोषने काहीच न बोलता फोन ठेवला ......

श्रीने परत त्याला कॉल करण्याचा प्रयत्न नाही केला .... दीडच्या फलाईटने निघायचं होतं त्याने

परागला येतो म्हणून कॉल केला .... बँग पँक केली त्यानी .... बाहेर विजांनी ताडवं घातलं होतं

मुसळधार पाऊस तेवढ्या रात्री त्याने ड्रायवरला उठवून आणलं ....

✈✈✈✈✈✈