Get it on Google Play
Download on the App Store

भाग - 11

श्री तेवढ्या मुसळधार पाऊसात निघाला कारमध्ये त्याने ऋतुजाने

दिलेली चिठ्ठी काढली ...
®®®
डियर श्री ,

सर्वांत आधी सॉरी प्लिज .... तुझ्या समोर व्यक्त व्हायची भिती वाटली मला म्हणून

असं अनामिकपणे पत्र लिहीली मी ... तुला माझा राग आला तर सांगते मला माफ करशील ना !

अरे माहिती नाही मला ... पण , तुला खरं सांगू मी प्रेमात पडली यार तुझ्या ... सारखे तुझे विचार

येत

असतात मनात . उठता बसता खाता पिता झोपेतही तू आणि तूच .... असं वाटतं मी प्रेमात पडली

तुझ्या I really love with you ....श्री !

आपण ज्या व्यक्तिवर खरं प्रेम करतो हे त्या व्यक्तिला सांगन खुप गरजेचं असते अरे नाहीतर वेळ

निघून जाते त्या तुलनेत व्यक्तिही आपल्या पासून दुरावतात ... तू नकार दिला तरी मी समजेल

मी प्रेमात माती खाल्ली म्हणून ... पण प्रेम एकतर्फी ठेवणं ही खंत मनात बाळगून जगता नसतं

आलं मला ... तू माझ्या प्रेमाचा स्विकार करणार आहेस की नाही , हे मला ठाऊक नाही !

तू होकारच द्यावा मला असं ही काही नाही .... प्रेमही आतंरीक ओढीने व्हायला पाहिजे आणि मला

ते तुझ्यावर झालं ... तू प्रेम करतो माझ्यावर असं मला कधी जाणवू दिलं नाही ... मला असं का

वाटतं असावं की तू प्रेम करतो माझ्यावर कदाचित ह्या मुळे आपली मैत्री प्रेमाच्या अलीकडे आणि

मैत्रीच्या पलीकडे आहे ..... घुसमट होते मला नेमकं आपल्यात नातं तरी कोणतं आहे ह्याच

विचाराने मैत्रीच की प्रेमाचं ??

तुलाच विचारावे वाटले प्रश्न माझ्या मनातले छळतात हे प्रश्न मला खुप तू प्लिज समजून घे

आणि प्रेम करते मी तुझ्यावर .... रागावू नको माझ्यावर समजून घेशील ना मला श्री ??

तुझीच ,

ऋतुजा 😘

श्री ला एवढा आनंद झाला त्याला क्षणभर वाटलं कार मधून उतरावं आणि पाऊसात नाचून

सरीना सांगावं ... मिळालं माझं प्रेम मला !

आपण ज्याचा प्रेमात जगतो तो ही आपल्यावर प्रेम करतो हे कळल्यावर जो आनंद

ओसरून वाहू लागतो ती प्रेमाची फिंलिगच किती सुखद असते ना !

💕