त्रिकोण योग
१) पहिला त्रिकोण:-लग्न,पंचम व नवम या स्थानांचा होतो.
प्रथम स्थान स्वतःचा उत्कर्ष ,पंचम स्थान
वंश विस्तार तर नवम स्थान धार्मिक तीर्थ
यात्रा याचा विचार करतात
२)दुसरा त्रिकोण:-द्वितीय,षष्ठ, व दशम स्थानांचा होतो.द्वितीय स्थान बलवान
असेल आर्थिक स्थिती उत्तम राहते,दशम
व्यवसाय नोकरी,राजमान्यता मिळते.
आर्थिक उन्नती करणारा हा योग आहे
३)तिसरा त्रिकोण:-तीन,सात अकरा या
स्थानांचा होतो.अशी माणसे व्यवहारी असतात.सातवे स्थान बलवान असल्यास
स्त्री कडून फायदा होतो.एकादश स्थान
बलवान असल्यास लोक संग्रह
४) चवथा त्रिकोण:-चार,आठ व बारा या
स्थानांचा होतो.विरक्ती,दैवी ओढ,गूढ विद्या
याची आवड.
चारही त्रिकोण प्रगती कारक आहेत.याचा
विचार करतांना त्या स्थानात कोणते ग्रह
आहेत त्याचाही विचार करावा.