Android app on Google Play

 

देहत्रय निरसीत चिन्मय जें...

 

देहत्रय निरसीत चिन्मय जें उरले ।

तेंमी ऎसे तुझिया वचनें जाणवलें ॥

पांचाच्या अन्वयें अवघे समरसलें ।

ज्ञानादि त्रिपुटींचे भानहि माळवलें ॥

जय देव जय देव सद्‌गुरुनाथा ।

तव पददर्शनमात्रे हरली भवव्यथा ॥ धृ. ॥

आहे नाही पण या विरहित मी साचा ॥

माझ्या ठायीं व्यापक स्थितिलय विश्वाचा ॥

तेथे भेदाभेद मायिक तो कैचा ।

घडला अनुभव ऎसा प्रकार स्वामीचा ॥ २ ॥

जें कांही बोलणें जललहरिप्राय ।

त्याहुनि वर भिन्नत्वें विनवावें काय ॥

आतां मौन्यें तुझें वंदावे पाय ।

गोसावीनंदन सहजचि चिन्मय ॥ जय. ॥ ३ ॥