स्वानुभवें भवतारक जय सद्...
स्वानुभवें भवतारक जय सद्गुरु मौनी ।
वेदप्रणींत निगुगुजरहस्य प्रकटोनी ।
मृगजलत जग मिथ्या सर्वहि निरसोनी ॥
स्वानंदामृत चिन्मय प्रकटसि ह्रदभुवनी ॥ १ ॥
जय देव जय देव जय सद्गुरुमौनी,
श्रीसदगुरुमौनी डुल्लसि ब्रह्मानंदे अतिप्रेमें करुनी ॥ धृ. ॥
अखंड परमानंदचि विसरुनी हे प्राणी ।
अविवेके अपणातें जीवचि मानोनी ।
विषवर विषयसुखातें सुख हें कल्पोनी ।
पावति अति दु:खचि तें हिंडति बहु योनी ॥ २ ॥
दुर्लभ दुर्लभ त्यांतहि पुण्यकृत कोणी ।
वैराग्याद्यधिकारी भाविक वरदानी ।
तद्भक्ती स्तव तूं सगुणाकृति धरुनी ।
त्या त्या स्थळासि जाऊनि तारिसि ते प्राणी ।
दृढतर वैराग्याने विषयेच्छा हरिली ।
प्रपंच निरसुनि बुद्धी स्वरूपीं मेळविली ।
देहद्वाराशी नखर नगरी हे त्याजली ।
रघुनाथीं गुरुचरणी भगवन्मति रमली ॥ ३ ॥
त्वंपदतत्पदसाक्षी सन्मय सुखराशी ।
अंतरबाहेर सर्वहि व्यापुनि तूं अससी ।
विरचितगुरुभक्ती जे त्यातें नाढळसी ।
लक्ष्मण वंदित आत्मा अभेदचरणांसी ॥ ४ ॥