Get it on Google Play
Download on the App Store

प्रभाव

धारपांच्या अनेक कथा ह्या इंग्रजी कथांचे मराठी रूपांतरण होत्या. कदाचित ह्यामुळेच त्यांना साहित्यिक म्हणून विशेष सम्मान कधी मिळाला नाही. शपथ हि त्यांची कथा स्टीफन किंग ह्यांच्या तुफान लोकप्रिय इट चे रूपांतरण होते. त्याशिवाय स्पेस ब्रिज ह्या कथेचे त्यांनी अवकाशाशी जडले नाते म्हणून रूपांतरण केले. सालेम्स लॉट ह्यांचे सुद्धा त्यांनी रूपांतरण केले होते. 


टाॅम गाॅडविन ह्या लेखकाने स्पेस प्रिजन नावाचे पुस्तक लिहिले होते त्याची कथा धारप ह्यांनी जवळ जवळ शब्दशः रूपांतरित केली होती जिद्द ह्या नावाने. 


धारप ह्यांच्या कथा ओरिजनल नव्हत्या म्हणून धारप ह्यांना अनेक लोक नवे ठेवत आले पण माझ्या मते भारतातील आम्हा गरीब लोकांना जे जगांत त्या काळी मागे पडत होते त्यांना त्यांनी एक नवीन विश्व दाखवले. कलेच्या क्षेत्रांत प्रगती करण्यासाठी समाजाला इतर क्षेत्रांत सुद्धा प्रगती करावी लागते. नाहीतर आम्हाला साहित्य सुद्धा इतरांकडून उधार आणावे लागेल.