समर्थ : धारपांचे नायक
समर्थ हा धारपांचा हिरो. अनेक कथांत समर्थ गूढाचा शोध लावतो. समर्थ आणि अप्पा जोशी हि जोडगोळी काही प्रमाणात भारतीय शेरलोक आणि वॉटसन प्रमाणे होती. फरक इतका कि समर्थ हे एक संत प्रमाणे होते आणि त्यांना अतींद्रिय शक्ती साधने द्वारे प्राप्त होत्या तर अप्पा जोशी हे साधारण मनुष्य होते. कृष्णचंद्र आणि ओंकार हि अशी दुसरी जोडगोळी धारप ह्यांनी लिहिली. कृष्णचंद्र ह्यांना सुद्धा अतींद्रिय शक्ती होत्या पण ते संता प्रमाणे विरक्त नसून जीवनाचा आनंद सुद्धा घ्यायचे.
समर्थ कथेत आले कि वाचक सुटकेचा निश्वास सोडायचे कारण समर्थ शेवटी चांगल्याच विजय वाईटावर घडवून आणायचेच. समर्थ ह्या हिरोला घेऊन धारपांच्या सुमारे १५ तुफान लोकप्रिय पुस्तके लिहिली.
समर्थ आणि कृष्णचंद्र शिवाय पंत हा मांत्रिक सुद्धा त्यांच्या कथांत हिरो म्हणून यायचा. पंत हा मंत्री असून त्याची एक फिरती खोली होती. हि खोली कधीही कुठेही प्रकट होऊ शकत असे आणि त्या खोलीत प्रचंड महाभयानक शक्ती जनावरांच्या मूर्तीच्या स्वरूपांत ठेवल्या होत्या. पंत मग त्यांचा वापर करून दुर्जनांचा विनाश आणि सज्जनांचे रक्षण करायचे.