धारपांच्या लेखनाची शैली
त्याकाळी मराठी साहित्यात भयकथांची कमी नव्हती. पण सर्वच भयकथा एकाच शैलीच्या होत्या. कुणी तरी सवाष्ण मरून भूत झाली, एखादी चेटकीण, कला जादू अश्याच गोष्टीभोवताली इतर लेखक ताल धरत असत. पण धारप हे ह्या सर्वापासून अत्यंत वेगळे होते. कदाचित इंग्रजी पल्प फिक्शन चा प्रभाव त्यांच्यावर पडला असावा. धारप हे आपल्या कथानकात निव्वळ धक्का तंत्रावर अवलंबून ना राहता अफलातून कल्पनाशक्तीवर अवलंबून राहत असत. "अत्रारचा फास" ह्या कथेत त्यांनी एक अशी कथा लिहिली होती जिथे एका वाळूच्या कणात विश्व सामावलेले असते आणि तो वाळूचा कण एका हिंगाच्या डबीत असते.