Android app on Google Play

 

पुस्तकाच्या प्रति

 

निळावंती ग्रंथाच्या प्रति बाजारांत उपलब्ध नाहीत कारण मुळांतच हे एक पुस्तक नाही. काळाच्या ओघांत निळावंती ग्रंथाच्या अनेक प्रति निर्माण झाल्या आणि त्यांत बदलावं सुद्धा झाले आहेत. हे ज्ञान गुप्त स्वरूपाचे असल्याने गुरु शिष्य परंपरेतूनच ते दिले जाते. 

काही प्रति आणि निळावंती ग्रंथाचे जाणकार 

जळगांव जामोद जवळील भेंडवळ या गावातील श्री वाघगुरु़जी यांना हि विद्या अवगत आहे म्हणतात. 

फुनवाडी बाजार जवळ बुकडी बुद्रुक इथे रस्तंभा नदीच्या संगमाजवळ कनकरनाथ भेंडोळेगुरुजी यांच्याकडे हा ग्रंथही आहे आणि त्यांना ज्ञानही आहे अशी माहिती आहे.

खेड शहराच्या जवळ चाकदेव म्हणून गांव आहे इथे पपू घारनाथ गुरुजी राहतात. त्यांच्याकडे निळावंती ग्रंथाची २ जुनी ताडपत्रे आहेत पण त्यावरील भाषा कुणाला हि येत नाही. 

कर्नाटकातील एनॅममूर येथे दार अमावास्येला एक ठिकाणी अनेक तांत्रिक आणि स्त्री मांत्रिक येतात तिथे काही जणांना निळावंतीतील अंजनाची माहिती आहे आणि अनेक जण मार्जार अंजन सुद्धा वापरतात. 

येथील काही मांत्रिकाकडे एक खास अंजन आहे ते तुम्ही तुमच्या डोळ्यांत घातले तर तुमची वस्तू कुणी चोरली असेल तर तुम्ही त्या व्यक्तीचा चेहरा पाण्यात पाहू शकता.