निळावंती ग्रंथ आणि गैरसमज
निळावंती ह्या ग्रंथाविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यातील पहिला गैरसमज म्हणजे ह्या ग्रंथाच्या वाचनाने वेड लागते किंवा मृत्यू येतो. लोकांच्या मते ह्या ग्रंथात पशु पक्षी ह्यांची भाषा समजण्याचे ज्ञान आहे आणि हे ज्ञान घेण्यासाठी काही तरी त्याग करावा लागतोच. स्वामी विवेकानंद ह्यांचा अकाली मृत्यू ह्या पुस्तकाच्या वाचनाने झाला. ह्या पुस्तकाची संपूर्ण कथा कधीही ऐकू नये किंवा सांगणाऱ्याने सांगू नये. भारत सरकारने ह्या ग्रंथाचे मुद्रण बंद केले आहे. अश्या अनेक अफवा पसरवल्या जातात.
पण ह्यांत तथ्य आहे का ? आमच्या देशांत गूढ विद्याविषयी शेकडो ग्रंथ आहेत त्यांत निळावंती ह्या ग्रंथातच काय असे विशेष आहे ? ह्या अफवा कोणी आणि का पसरवल्या ?
हे आम्ही पुढील पानावर समजून घेऊ.