तुळस
सांगतेय तुळस
सदा वाढत राहा
कीर्तीच्या मंजिऱ्या
पसरवत राहा
सद्भाग्य परिजनांचे
घडवत राहा
ध्येयाचा वणवा
शांत कर
निरंजनाच्या ज्योतिसम
शांत तेवत
कर मार्गक्रमण
हळुवारपणे
इतरांना प्रकाश देत
पावित्र्य अबाधित ठेऊन
कर तुझे कर्तव्य
पण विसरू नकोस मुळांना
ज्यांनी पोषण दिलं
आधार दिला
त्या साऱ्यांनाच
स्मरण करून पवित्र हो
नाही झाला गळ्यातली माळ
चरणांची पायधूळ तरी हो...