Get it on Google Play
Download on the App Store

झोका


तुटली दोरी

तुटला झोका

तव प्रेमाचा

तव प्रेमाचा....

लाडिक आठवणी

केवळ आता

सदैव सोबत

घेऊन जगतो....

तुझे नि माझे

बंध अतूट

नात्यात तरी

येत दुरावा....

ना भांडण

ना वाद कधी

तरी वियोग

मज माथी....

क्षणिक सुख

तुजसोबतचे

जीवनभर

सांभाळतो आता....

गाडी आयुष्याची

सुटताना मग मी

येत त्वरेने

तुज भेटीला...

दोरी आयुष्याची

झोका साथीचा

तुजसवे मी

अन मजसवे तू

फक्त तूच...