Ii मोक्षाची मोहिनी ii
मन सुम्भापरी
पिळदार त्या भावना
कधी सुख कधी माया
कायम दुःखाची शिदोरी
पीळ चढे , पीळ चढे
तीळ तीळ तुटे ,मन दोरीपरी
मन यौवनी झेलती
घेऊनि सुखदुःखाची मंजिरी II
वाट चाले वाट चाले
अश्रू बने सांगाती
वृद्ध जरी जाहले
तरी त्यात गुंतले II
देह चिपळ्यांपरी
आत्मा मृदूंग तो
मोह पाश भवती मना
मोक्ष मार्गे भुजंग तो
कर दमन तू पाशांचे
तोड सुम्भ या योनी
मंथनातून गवसेल
मोक्षाची मोहिनी II
सिद्धेश्वर विलास पाटणकर