॥ ओशाळला मृत्यू इथेही ॥
तिचा माठ खालीच होता
माटाचा काठ शुष्क होता
जमीन सारी भेगाळलेली
नजर थेम्ब थेम्ब पाण्यासाठी आसुसलेली
हुंदके जणू कोरडे नाले
रक्त आटुनी शरीर तप्त झाले
ओशाळला मृत्यू इथेही
त्यालादेखील मरण प्रिय झाले
स्वगत मृत्यूचे..........
जीव घेऊ तो घेऊ , पण घेऊ कुणाचा ?
आत्मा कधीच गेला निघून ,
संघर्ष अविरत जीवनाचा
जन्मपाशात जो तो अडकला इहलोकी
मी सुखी मानतो स्वतहाला , यमलोकी
ठिगळ लागलेलं कापड
ती पाण्याची धडपड
अन्नाची तडफड
श्वास कोंडला रे माझा
मी मृत्यू जरी असलो
जरी असलो मी काळ
बघवत नाही मलापण ,
ते रडणारं बाळ
सिद्धेश्वर विलास पाटणकर