Android app on Google Play

 

कशी ग राणी तू राहतेस माझ्या विना

 

कशी ग राणी तू राहतेस माझ्या विना


दु:ख विरहाचे सांगशील तू तरी कुणा


आल्याचा तो चहा आता कुणासाठी करते


प्रेमाची गोडी तुझ्या रोजच वाढते


अंघोळीसाठी माझं टॉवेल विसरण


तुला आता दररोजच आठवत असेल


दिवसाचा एक एक क्षण तुझा


माझ्याविना कसा कटत असेल


तू केलेल्या शिऱ्याचा अजुन सुंगध दरवळत असेल


नयनातील अश्रू तुझ्या त्यात ओघळला असेल


विरहाचे दु:ख राणी तुला मला छळते


मनातली व्यथा तुझ्या मला नेहमीच कळते


नको तू काळजी करू मी लवकरच परत येईल


मग वसंतातील प्रितीला पुन्हा नवा बहर येईल


-    मुकुंद निळकंठ कुलथे