लगीन कवा करत ??
झालं लग्नाचं वय आता, सगळे मले पुसे
लग्नावाले माझे दोस्तबी मले पाहून हासे
काय तर म्हणे लेका लगीन कवा करत ?
किती दिवस असं स्वत:च पाणी भरत ?
आधीच पोरी आहेत कमी त्यात कायले घेत रिक्स
दुसरीकडे पाह्यतो की मामाचीच आहे फिक्स
तुह्या वईच्या पोऱ्हाइले झाले दोन दोन पोरं
तुह्या लग्नाचा तर सगळ्याहीले लागून राहीला घोर
एकदा वय गेल्यावर लेका मग काही मजा नसते
मग असली बायको कितीही सुंदर तरी काम फसते
मी म्हणालो लेका गप्प आता कायले शिल्लक बोलतं
मनातलं दु:ख माह्या कायले चारचौघात खोलतं ?
झालं या वर्षी तर ठीक नाहीतर कुणाची पोरगी पळवून नेईन
आणि नाहीच जमल तर रूद्राक्ष घालून बाबा तरी होईन
लगीन झाल्यावर लेका माणूस मग कायमच फसतं
अन् काय काय होतात हाल त्याचे हे तुह्याकडे पाहून दिसतं.. !!