Android app on Google Play

 

किस्से कॉलेजचे पार्ट ३

 

किस्से_कॉलेजचे
पार्ट ३

वर्ष २००५-०६

(Recap: पार्ट १-२ मधे.."शोधा म्हणजे सापडेल")

नविन पुस्तकांचा नविन गंध वगैरे वगैरे पद्धत कॉलेजमधे गेल्यावर लागु पडत नाही, कारण एका बोटावर रजिस्टर फिरविणारे ईथ आकर्षणाचे केंद्र अन् बिंदुही असतातच...

सेकंड ईअर- पु.ल.चा सखाराम गटणे जर वाचला असेल तर त्याला सुद्धा कॉम्पलेक्स होईल अशी मंडळी क्लासमेट म्हणुन लाभली होती, सोप्या भाषेत, सज्जन, सुसंस्कृत, शालीन, आज्ञाधारक असल्या शब्दांना अक्षरशः जगणारे अन् जागणारे दिपक कदम, मोहसीन तांबोळी, सुनिल अन् निलेश शेळके...अन् दुसरीकडे कमालीचा विरोधाभास म्हणजेच मनिष गायकवाड(मार्टिन उर्फ माया), प्रशांत बोराटे, निलेश भाकरे अन् मी...५-६ मुलीही होत्या वर्गात त्यांचाही आवाज असायचा कधी-कधी पण वरची सज्जन मंडळी विश्वमित्र यांचेच मित्र असल्यासारखे कायमच शांत अन् ध्यानमग्न टाईप...त्यांच्या तपश्चर्येची चांगलीच फळ त्यांना कायम मिळत राहोत हीच प्रार्थना...

गुन्हेगाराने कारागृहातुन शिक्षा भोगुन आल्यावर समाजाचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन जसा बदलतो तसाच 'काटकोन-त्रिकोण' गॅप खाऊन आल्यामुळ आम्हाला काही जणांच्या नजरेत दिसायचा(ऊगाचच)...समोरच्याला नजरेणेच गार-गरम करणारे आम्ही सराईतासारखेच वावरत लेक्चर, प्रॅक्टीकल्स करायला लागलो. मेकॅनिकल-सिव्हील-ईलेक्ट्रॉनिक्स सगळीकडेच आमच्यासारखे सराईत अन् खुपशे नविन आलेले चांगले मित्र होते.

याच वर्षात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा गाजवण्याचा योग आला होता, सापडलेल्या जाहिरातीच्या कात्रणाला सिरिअसली घेवुन तयारी केली (स्पेशल आभार सगळेच होस्टेलचे मित्र, कारण ते न कंटाळता परत-परत एेकतच होते)...विजेता ठरल्यामुळं दिवंगत अभिनेते निळु फुले यांना भेटायला मिळाल, H.O.D. कापसे सर यांनी केबिनमधे बोलवुन कौतुक केल, सरांनी अन् निळु फुलेंनी सेमच प्रश्न विचारला, भाषणाचा विषय कोणता होता? ऊत्तर होत..

"ईतिहासाच्या दरबारातील शिवाजीराजे"

हे वर्ष भरपुर कारणांमुळ अन् कारनाम्यांमुळसुद्धा खास होत...जुडवा आलम बंधु, गवळी बंधु, चोथे बंधु, ढमढेरे बंधु अन् बरेचशे भाऊ-बहिणी कायमच चर्चेत होते. अक्षरशः कॉलेज कशाशी खातात अन् त्याचा भावि आयुष्यात कुठे आणि कसा ऊपयोग होतो हे शिकवणार हे वर्ष होत.

शिक्षक दिन, सावित्रीबाई फुलेंची जयंती अन् अनिता गाडे, ज्ञानेश्वर रसाळ यांच भाषण, मुंबई ट्रिप, सॉलिड गॅद्रिंग, आख्या वर्गात एकटाच असुन पण G.S. ची तयारी करणारा, आपलाच अंताक्षरीचा अँकर सुमित दुबल, D.J. & group चा डान्स, नविनही कुठच कमी नव्हते, अतिशय सुपर्ब परफॉरमन्स बाय एव्हरीवन...

नविन वरुन आठवल, या वर्षीचे रुम पार्टनर होते नविन काळे, अतिशय हुशार माणुस पण खुपच शांत, महिन्या-दोन-महिन्यात कधी तरी बोलण व्हायच ते पण झालच तर..तरी पण रुममधे कधीच आम्ही भयानक शांतता-बिंतता फिरकु देत नव्हतो, माझ्यासोबतचे जे थर्ड ईअरला होते त्यांच्यातही खुप जणांच तुटलेल बोलण पिच्चरच्या क्लायमॅक्ससारख एकदम शेवटच्या मिनटाला क्लिअर झाल.

स्पेशल आठवण: फर्स्ट ईअरला असताना एक नविन प्रिन्सिपल आले होते, त्यांनी चांगल चाललेल कॉलेज आणखीन सुधरवण्यासाठी सुधारणांचा नुसता धडाका लावला होता...वर्षाच्या आत गायब झालते ते...

Nilu