Get it on Google Play
Download on the App Store

किस्से कॉलेजचे पार्ट १

किस्से_कॉलेजचे
पार्ट १

वर्ष: २००३-०४

Govt. Polytechnic ला नंबर नाही लागला म्हणुन IGP मधे शिकण्याच भाग्य लाभलं. Accidentally computer branch ला admission मिळाल अन् IGP चा अविस्मरणीय प्रवास सुरु झाला.

अहमदनगर जिल्हा, श्रीगोंदा तालुका, बेलवंडी गाव तिथुन ३किमी महादेववाडी अन् तिथुन आत २किमी वर कॉलेज. कॉलेजच्या ३ साईडनी मस्त शेती अन समोर प्राथमिक Z.P. शाळेच मोठ्ठ मैदान.

कॉलेजच्या जागेवर पुर्वी साखर कारखाना होता अस ऐकल होत, गोडाऊन सारखे लेक्चर हॉल, प्रक्टिकल लॅब्स, मेस आणि होस्टेल तशी आप-आपल्यापरीणे साक्ष पण देत होते.

कॅम्पस मधे एक प्रकारचा जिवंतपणा होता जो तुम्हाला तिथ खिळवुन ठेवण्यासाठी पुरेसा होता. १०वी नंतर(वय १५-१६) डायरेक्ट F.Y. ला, मोठ्या सिटीतुन आल्याचा गैरसमज, घरापासुन दूर, मामाच्या घरी राहायला म्हणुन २ बोट हवेत होतो सुरुवातीला. मेकॅनिकल, सिव्हील अन् कॉम्प्युटर तिन्ही बॅचला फुल अॅडमिशन झाले अन् कॉलेज सुरु झालं.

कॉलेजला येण्यापासुन घरी जाण्यापर्यंत रोज नविन गोष्टी शिकायला मिळत होत्या...मनाच्या डाईरीत अनुभवाच्या पानावर प्रत्येक गोष्ट कोरली जात होती. हुशार असुन पण अभ्यासाकडं थोड दुर्लक्ष झालं अन् पहिल्या सेमला ३ बॅक राहिले(५ पैकी). तो पर्यंत १५ ऑगस्ट, ५ सप्टेंबर भाषणांमधुन थोडा गाजवला होता पण रिझल्टमुळं पार वाट लागली होती. शिक्षक सर्व चांगले होते पण आमचचं घोड(अभ्यासाच) थोड लंगड होत.

मित्र खुप चांगले मिळाले होते, ते सगळे पण अभ्यासु होते, हुशार होते पण आमचीच मनाची गाडी चालु लेक्चरमधे वर्ल्ड-टुरला निघुन जाईची..मग कसा मेळ बसणार होता.

रिझल्टने आत्मविश्वास नखभर पण कमी होवु दिला नाही.. न खचता, न थकता जोमाने अभ्यास केला, रात्रीचा दिवस केला, रिव्हीजनच्या रिव्हीजन केल्या..पुर्ण वेळ देवुन प्रामाणिक प्रयत्न केला...सेकण्ड सेमच्या ५ सबजेक्ट सोबत पहिले ३ बॅकलॉग असे टोटल ८ पेपर दिले.

३ महिन्यानंतर रिझल्ट लागला ८ पैकी ३ क्लिअर...टोटल १० पैकी ५ क्लिअर अन् ५ फेल...नेक्स्ट ईअरला जाण्यासाठी कमीतकमी ६ क्लिअर पाहिजे होते. पण आता काहीच करता येणार नव्हत...नाराज नाही झालो..हरलो तर मुळीच नाही.. थोड वाईट वाटत होत सोबतचे मित्र आता रोज भेटणार नाहीत म्हणुन..पण स्वत:ला समजवणं महत्वाच होत अन् तेच मी त्या वेळेस केल.

To be continue...

Nilu