छत्रपती शिवरायांवरची श्रद्धा
बुगटी मराठय़ांच्या तीन वर्गापकी हा वर्ग संख्येने सर्वात कमी आहे. हा वर्ग सुरुवातीपासून बुगटी सरदारांशी संबंधित होता व त्यामुळे त्यांना मोठा मान मिळत असे. आज या वर्गातले काही लोक मोठे जमीनदार आहेत. या समाजातील युवकांना शिवाजी महाराजांचा अभिमान आहे. बऱ्याच युवकांच्या फेसबुक प्रोफाइलवर शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो. या तिन्ही वर्गातील मराठी बांधवांनी इतर बुगटी जमातींपेक्षा शिक्षणात लवकर प्रगती केली. आज या समाजातील लोक इंजिनीअर्स, सरकारी अधिकारी, शिक्षक, प्रोफेसर व उच्चपदस्थ राजकारणी आहेत. त्यांची सांपत्तिक स्थितीही इतर बुगटी समाजापेक्षा चांगली आहे.