२६ नोव्हेंबर २००८ मुंबई
२६ नोव्हेंबर २००८रोजी देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुन्हा एकदा अतिरेक्यांच्या हिटलिस्टवरआली . एके ४७ रायफल्स आणि ग्रेनेड्सनं सज्ज सशस्त्र अतिरेक्यांचा मुंबईवर हल्ला चढवला . दक्षिण मुंबईत विविध ठिकाणी अंदाधुंद गोळीबार, ताज महाल आणि ओबेरॉय,ट्राय़डेन्ट या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये अतिरेक्यांनी परदेशी नागरिकांना ओलीस धरलं. अतिरेकी अरबी समुद्रमार्गे मुंबईत घुसले होते. घुसखोरांनी एका कोळ्याला ठार करून त्याची बोट वापरली होती. या हल्ल्याचा प्रमुख आरोपी अजमल कसाब याची केस अनेक वर्षे चालवली गेली आणि अखेरीस ५ नोव्हेंबर २०१३ रोजी फासावर लटकवले गेले