अमूर्त देव कल्पना
पुढे अमूर्त देवतांची कल्पना आली ज्यांना 'असुर' म्हटले गेले. 'देव' आणि 'असुर' हे दोन्ही शब्द आधी देवतांसाठीच वापरण्यात येत असत.
ऋग्वेदाच्या अतिप्राचीन अंशामध्ये 'असुर' हा शब्द याच अर्थाने आलेला आहे.
वेदांमध्ये 'वरुण' ला असुर म्हटलेले आहे आणि सर्वांचा जीवनदाता 'सूर्याची' गणना 'सूर' आणि 'असुर' दोन्हीमध्ये आहे.
पुढे देवांचे उपासक 'देव' शब्दाला देवतांसाठी वापरू लागले आणि 'असुर' म्हणजे राक्षस मानू लागले.