Get it on Google Play
Download on the App Store

शुक्राचार्य


असुरांचे पुरोहित शुक्राचार्य भगवान शंकराचे भक्त होते. भृगु ऋषी आणि हिरण्यकश्यपूची कन्या दिव्या यांचे पुत्र शक्राचार्य यांच्या कन्येचे नाव देवयानी आणि पुत्राचे नाव शंद आणि अर्मक होते. आचार्य शुक्राचार्य शुक्र नीती शास्त्राचे प्रवर्तक होते. त्यांची शुक्रनीती आजही लोकांमध्ये महत्वपूर्ण मानली जाते. त्यांचे पुत्र शंद आणि अर्मक हिरण्यकश्यपूकडे शुक्र नीतीचे अध्यापन करत असत. आधी त्यांनी अंगिरस ऋषींचे शिष्यत्व ग्रहण केले परंतु जेव्हा ते आपल्या पुत्रांच्या प्रती पक्षपात करू लागले तेव्हा यांनी भगवान शंकराची आराधना करून मृत संजीवनी विद्या प्राप्त केली जिच्या बळावर देवासुर संग्रामात असुर अनेक वेळा विजयी झाले.