Get it on Google Play
Download on the App Store

पैल तो गे काऊ

पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ॥१॥

उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥

दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥

दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥

आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥

ज्ञानदेव ह्मणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥

संत ज्ञानेश्वर

स्तोत्रे
Chapters
अधिक देखणें तरी अरे अरे ज्ञाना झालासी अवघाचि संसार सुखाचा अवचिता परिमळू आजि सोनियाचा दिनु एक तत्त्व नाम दृढ धरीं काट्याच्या अणीवर वसले कान्होबा तुझी घोंगडी घनु वाजे घुणघुणा जाणीव नेणीव भगवंती जंववरी रे तंववरी तुज सगुण ह्मणों कीं तुझिये निडळीं दिन तैसी रजनी झाली गे देवाचिये द्वारीं उभा पडिलें दूरदेशीं पसायदान पैल तो गे काऊ पंढरपुरीचा निळा पांडुरंगकांती दिव्य तेज मी माझें मोहित राहिलें मोगरा फुलला (१) योगियां दुर्लभ तो म्यां रुणुझुणु रुणुझुणु रे रूप पाहतां लोचनीं रंगा येईं वो येईं विश्वाचे आर्त सगुण निर्गुण दोन्ही सगुणाची सेज निर्गुणाची समाधि साधन संजीवन हरि उच्‍चारणीं अनंत ॐ नमोजी आद्या