तुझिये निडळीं
तुझिये निडळीं कोटि चंद्र-प्रकाशे ।
कमल-नयन हास्य-वदन हांसे ॥१॥
कृष्णा हाल कां रे कृष्णा डोल कां रे ।
घडिये घडिये गूज बोल कां रे ॥२॥
उभा राहोनियां कैसा हालवितो बाहो ।
बाप रखुमादेविवरु विठ्ठलु नाहो ॥३॥
कमल-नयन हास्य-वदन हांसे ॥१॥
कृष्णा हाल कां रे कृष्णा डोल कां रे ।
घडिये घडिये गूज बोल कां रे ॥२॥
उभा राहोनियां कैसा हालवितो बाहो ।
बाप रखुमादेविवरु विठ्ठलु नाहो ॥३॥