Android app on Google Play

 

गीतेत म्हटलेले आहे

अर्जुनाने कृष्णाला हाच प्रश्न विचारला होता की तुमचे असे म्हणणे आहे की प्रत्येक गोष्ट एकाच ऊर्जेपासून बनलेली आहे आणि प्रत्येक गोष्ट दैवी आहे, जर तेच देवत्व दुर्योधनात देखील आहे, तर मग तो अशी कामे का करीत आहे? कृष्णाने उत्तर दिले, "ईश्वर निर्गुण आहे, दिव्यता निर्गुण आहे. तिचा आपला असा कोणताही गुण नाही." याचा अर्थ आहे की ती केवळ विशुद्ध उर्जा आहे. फक्त ते वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करत आहेत. जो वाघ तुम्हाला खाण्यासाठी येतो त्याच्यात देखील तीच उर्जा आहे आणि कोणी देवता, जी येऊन तुम्हाला वाचवू शकते, तिच्यात देखील तीच उर्जा आहे. फाज्त त्या वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात.