Android app on Google Play

 

काळी जादू काय असते?

जाणकार लोकांचे म्हणणे आहे की ही जादू बाकी काही नाही, फक्त एक बंच ऑफ एनर्जी आहे. जी एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी पाठवली जाते किंवा एका मनुष्याच्या द्वारे दुसऱ्या मनुष्याकडे पाठवली जाते.

Law of Conservation of Energy ने हे समजून घेता येऊ शकते. ज्यानुसार ‘’Energy may be transformed from one form to another, but it can not be created or destroyed’’. मराठीत सांगायचे झाले तर उर्जा ही निर्माण केली जाऊ शकत नाही त्याच प्रकारे ती नष्ट केली जाऊ शकत नाही. फक्त तिच्या एका स्वरूपाला दुसऱ्या स्वरुपात बदलता येऊ शकते.

उर्जेचा जिथे सकारात्मक वापर आहे, तिथेच नकारात्मक वापर देखील आहे. सनातन धर्माचा अथर्व वेद फक्त सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींसाठी उर्जेचा वापर यालाच समर्पित आहे. तुम्ही हे समजून घेणे आवश्यक आहे की उर्जा ही उर्जा असते, ते दैवी नाही आणि अदैवी देखील नाही. तुम्ही तिला कोणतेही रूप देऊ शकता. देवता किंवा सैतानी. ती विजेसारखी असते. वीज दैवी आहे की सैतानी? चांगली आहे की वाईट? जेव्हा ती तुमचे घर प्रकाशित करते, तेव्हा ती दिव्य असते.