Get it on Google Play
Download on the App Store

मनाला साधण्याच्या पद्धती

मनावर ताबा मिळवण्याच्या अनेक पद्द्धती आहेत पण सर्वांत सरळ मार्ग आहे प्राणायामाचा. एकदा का आपले मन एकाग्र आणि स्थिर झाले आणि एकाच दिशेला ध्यान केंद्रित झाले तर आपल्याला आपल्या इंद्रियांमध्ये एका विशेष शक्तीची जाणीव होते. दुसरी पद्धत आहे शवासनाद्वारे. यामध्ये तुम्ही जमिनीवर शवासनाच्या अवस्थेत झोप. ध्यान एकाग्र करून अचेतन मनाला जागृत करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा ही अवस्था खोलवर जाणवू लागेल तेव्हा समजावे की तुम्ही तुमच्या प्रयत्नात यशस्वी होत आहात. याशिवाय लोक मेणबत्ती, लाल प्रकाश, बल्ब, स्पायरल, पेंडुलम इत्यादींकडे पाहून सुद्धा आत्मसंमोहन करतात. परंतु या पद्धती कितपत विश्वसनीय आहेत ते माहिती नाही.