अनावश्यक संकल्पांना सोडून द्या
आपण आपल्या जीवनात अनेक संकल्प करतो. मला हे करायचे आहे - मला ते करायचे आहे. बायको - मुलं, काम, घर - गृहस्थी, समाज, धर्म, छंद आणि ऑनलाइन गोष्टींशी निगडीत कित्येक संकल्प आपण पूर्ण करायला जातो. यातील प्रत्येकाची समीक्षा करा. असे काय आहे जे चांगल्या परिणामांच्या तुलनेत जास्त तणाव देते? हे कार्य भावना बाजूला ठेवून केले पाहिजे. जे काही तुमच्या सुख आणि शांतीच्या आड येत असेल ते धरून बसण्यात काही अर्थ नाही. तो संकल्प आधी बाजूला करा जो सर्वांत जास्त तणाव देतो.