Get it on Google Play
Download on the App Store

नागबली

तीन दिवसाचे सुतक संपले की चौथ्या दिवशी नागबली करतात . या दिवशी ब्रह्मा , विष्णू , महेश , काल व सर्प  या पंच देवतांचे षोडषोपचारे पुजन होते . नंतर सर्पाचे दहनादी विधी होऊन अष्डपींड दान केले जाते . पुन्हा सायंकाळी राख वगैरे सावडून पाण्यात विसर्जीत करतात . हा विधी घराण्यात कोणी सर्प मारला असेल किंवा चुकून अपघाताने मारला गेला असेल तर त्याचे दोष जाण्याकरीता करतात . कुंडलीतील सर्प दोष ( कालसर्प ) याने जातात . 

याचे तीन दिवसांचे सुतक संपले की चौथ्या दिवशी आंघोळ वगैरे उरकून गुरूजींच्या घरी गणेशपुजन , पुण्याहवाचन , नवग्रह पुजन केले जाते याचे वैशीष्ट्य असे की जर तुमची जन्मनक्षत्र शांती झाली नसेल तर ती ही यातच होते इतके हे पुजन महत्वाचे असते . यानंतर भोजन वगैरे झाले की गुरूजींना ठरलेली दक्षिणा व ऐपती प्रमाणे दाने किंवा त्या ऐवजी यथाशक्ती दक्षिणा देतात . 

 हल्ली हा विधी फक्त तीन दिवसात उरकला जातो परंतु ते शास्त्र संमत आहे . 

पितृदोष जाण्या करीता श्री गुरूचरीत्राचा वीस आणि एकवीसावा अध्याय वाचल्याने ही श्री गुरूकृपेने पितर संतुष्ट होऊन त्यांना गती प्राप्त होते .