Android app on Google Play

 

नारायण बली

 

 नारायण बली . हा विधी घरात कोणाचा अपमृत्यू , अपघाती , आत्महत्या , खून , दिर्घ आजार , पाण्यात बुडून , भाजून , चोरांनी मारून इत्यादी प्रकारे मृत्यू झाला असल्यास त्याचा दोष जाऊन आत्यास गती मिळावी यासाठी केला जातो. तसेच घरातील मागील पिढीत दशक्रियादी कार्ये नीट झालेली नसतील त्या सर्वांचा , घरातील न केल्या गेलेल्या श्राद्धांचा सर्व प्रकारचे सात पिढीतील दोष पित्या कडून व माते कडून आलेले नाहीसे होतात . तसेच हा विधी वडिल आई हयात असतानाही मुलास करता येतो . 

या विधीची सुरूवात गंगा स्नानाने होते . तेथे गंगेची पुजा वगैरे करून त्या जलस्त्रोतास वंदन करून हे कर्म आज सुरू करीत आहोत हे सिद्धीस जावो असे आशिर्वाद मागून भस्म स्नान व मृत्तीका स्नान व पुन्हा गंगा स्नान केले जाते . यावेळी सफेद वस्त्र नेसायचे असते . एकट्या पुरूषानेही हा विधी केला तरी चालतो तसे समस्त कुटूंबीय तेथे हवेतच असेही काही नसते यासाठी एकटा माणूसही हा विधी जाऊन करून येऊ शकतो .

 यानंतर ओलेत्यानेच शिव मंदिरास प्रदक्षिणा घालून तेथील कुंडावरून पाणी भरून स्मशानात जातात . येथे . ब्रह्मा , विष्णू , महेश , यम व प्रेत या पंच प्रतिमांचे ( या प्रतिमा अनुक्रमे सोने , चांदी , ताम्र , लोह व शिसे यांच्या असतात ) पंचकलशांवर स्थापना करून षोडषोपचारे पुजन केले जाते . प्रेताचे पुजन करून यथाविधी त्याचे दहनादी कर्म केले जाते . त्या अनुषंगाने येणारे दशक्रियादी विधी केले जातात . नंतर त्या दहन केलेल्या पुतळ्याची राख वगैरे सावडून पाण्यात विसर्जीत करतात या दिवशी व पुढील तीन दिवस सुतक पाळतात .