Android app on Google Play

 

उपाय

 

 या पितृदोषासाठी त्रीपिंडी , नारायण बली , नागबली , केला जातो . तसेच आणखीही काही सोपे उपाय आहेत तेही केल्याने फायदा मिळतो . नारायण बली व नागबली हे दोन स्वतंत्र विधी आहेत . तीन दिवसात पहिले नारायण बली , दुसरी नागबली व तिसरे दिनी गणेशपुजन पुण्याह वाचनादी कर्म व नवग्रहांचे हवन केले जाते . त्रीपिंडी हा विधी एकाच दिवसात करता येतो.वरील विधी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर , नाशिक , नरसोबाची वाडी , वाराणसी , गोकर्ण महाबळेश्वर , गया प्रयाग , आदी ठिकाणी स्थान महात्म्यामुळे केला जातो . तसेच जेथे तुलसीची वने आहेत तेथे , वडाचे झाड , तलाव व श्री शिवमंदिर , संगमस्थान , समुद्र किनारा , पिंपळवृक्ष व शिवाचे मंदिर व नदी संगमाचे ठिकाणीही हा विधी केलेला चालतो . हल्ली हा विधी हरीहरेश्वर येथेही करतात .