अर्जदाराने अपील कसे करावे?
अर्जदाराने
मागितलेली माहिती अपूर्ण, चुकीची, दिशाभूल करणारी असेल किंवा माहिती
नाकारल्यास संबंधित अर्जदारास जनमाहिती अधिकार्याविरुद्ध अपिलीय अधिकार्यांकडे
अपील करता येते. हे अपील ३० दिवसांच्या आत करता येते. हा अपिलीय अधिकारी जनमाहिती
अधिकार्यापेक्षा अधिक अनुभवी असणारा, कामाच्या सर्व बाबी माहिती असलेला असतो. त्याने
अनुभवाचा व अधिकाराचा वापर नि:पक्षपातीपणे करावयाचा असतो. अपील असे करावे :
1) अपिलासाठी अर्ज
सादर करताना कागदावर २० रुपयांचा न्यायालय मुद्रांक चिकटवावा.
2) अर्जावर नांव,
पत्ता, जनमाहिती अधिकार्याचा तपशील द्यावा.
त्यात कोणती अपेक्षित माहिती मिळाली नाही याचा उल्लेख करावा. एकूणच तक्रारीचे
स्वरुप/अपिलाचे कारण स्पष्टपणे लिहावे.
3) शेवटी सही करुन
अर्ज दाखल करावा.
4) अर्जाची पोच
घ्यावी.
अपिलीय अधिकार्याकडे
अपील दाखल केल्यावर अर्ज केल्याच्या दिनांकापासून ४५ दिवसांच्या आत माहिती मिळू
शकते.