Android app on Google Play

 

हनुमान जन्म आणि लंकादहनाचे कारण

 

http://images.jagran.com/naidunia/lanka-dahan_2015311_17345_11_03_2015.jpg

श्री हनुमान रामायण रुपी माळेतील रत्न म्हणवले गेले आहेत, कारण हनुमानाच्या लीला आणि त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आणि कल्याणकारी आहे. हनुमानाने जिथे राम आणि सीतेची सेवा करून भक्तीचा आदर्श घालून दिला, तिथेच राक्षसांचे मर्दन केले, लक्ष्मणाचे प्राण वाचवले, देवतांचे देखील संकटमोचक बनले आणि भक्तांसाठी कल्याणकारी बनले. रामायानय आलेल्या हनुमानाशी निगडीत अशाच अद्भुत संकटमोचन करणाऱ्या प्रसंगांमध्ये लंकादहन प्रसिद्ध आहे.
सामान्यतः लांकादहनाच्या बाबतीत अशीच मान्यता आहे की सीतेचा शोध घेता घेता हनुमान लंकेला पोचले आणि रावणाच्या पुत्रासह अनेक राक्षसांचा अंत केला. तेव्हा रावणाचा पुत्र मेघनाद याने हनुमानावर ब्रम्हास्त्र सोडून त्याला नियंत्रणात आणले आणि रावनासमोर हजर केले. रावणाने हनुमानाच्या शेपटीला आग लावण्याची शिक्षा दिली. तेव्हा त्याच जळत्या शेपटीने हनुमानाने लंकेला आग लावून रावणाचा दंभ मातीत मिळवला. परंतु पुराणांमध्ये लंकादहनाच्या मागे देखील एक रोचक गोष्ट आहे, ज्यामुळे हनुमानाने शेपटीने लंकेला आग लावली. पाहूयात ती रोचक बाब काय आहे :
खरे म्हणजे, हनुमान हे शंकराचा अवतार आहेत. शंकराशीच निगडीत आहे हा सुरेख ओरसंग. एकदा माता पार्वतीच्या इच्छेनुसार शंकराने कुबेराला सांगून सोन्याचा एक सुंदर महाल निर्माण करून घेतला. परंतु रावण या महालाच्या सौंदर्यावर लुब्ध झाला. तो ब्राम्हणाचा वेश घेऊन शंकराकडे गेला. त्याने महालात पोरावेश करण्यासाठी शंकर - पर्वतीकडून पूजा करून घेऊन दक्षिणेच्या स्वरुपात तो महालच मागून घेतला. भक्ताला ओळखून शंकराने प्रसन्न होऊन तो महाल त्याला दान दिला.
दानात महाल मिळाल्यानंतर रावणाच्या मनात विचार आला की हा महाल प्रत्यक्षात माता पार्वतीच्या इच्छेने बनवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या सहमतीशिवाय हे शुभ होणार नाही. तेव्हा त्याने शंकराकडून माता पार्वतीच मागितली आणि भोळाभंडारी असलेल्या शंकराने ते देखील मान्य केले. जेव्हा रावण त्या महालासहित माता पार्वतीला घून जाऊ लागला, तेव्हा अचंबित आणि दुःखी झालेल्या मातेने विष्णूचे स्मरण केले आणि त्यांनी येऊन मातेचे रक्षण केले.
जेव्हा माता पार्वती रुष्ट झाली तेव्हा शंकराने आपली चूक काबुल करून माता पार्वतीला वचन दिले की त्रेता युगात मी वानर रुपी हनुमानाचा अवतार घेईन आणि त्यावेळी तू माझी शेपटू हो. जेव्हा मी सीतामातेच्या शोधात याच सोन्याच्या महालात म्हणजेच लंकेला जाईन तेव्हा तू शेपटीच्या रुपात लंकेला आग लावून रावणाला दंड कर.
हाच प्रसंग देखील शंकराचा श्री हनुमान अवतार आणि लंकादहन याच्या मागील कारण मानला जातो.