Android app on Google Play

 

कुंभकर्णाची झोप

 

http://www.haribhoomi.com/haribhoomi_cms/gall_content/2015/8/2015_8$largeimg125_Aug_2015_104253387gallery.jpg

राजा प्रतापभानू याने ब्राम्हणांच्या शापामुळे राक्षस रूपाने जन्म घेतला. आता पुढे... राजा प्रतापभानू यानेच रावण नावाच्या राक्षसाच्या रूपाने जन्म घेतला. त्याला १० मस्तके आणि २० हात होते. तो अत्यंत शूरवीर होता. अरिमर्दन नावाचा त्याचा एक छोटा भाऊ होता ज्याने कुंभकर्णाच्या रूपाने जन्म घेतला. त्याचा जो मंत्री धर्मरुची होता तो रावणाचा सावत्र भाऊ झाला. त्याचे नाव बिभीषण होते. तो भगवान विष्णूंचा फार मोठा भक्त होता. राजाचे जे सेवक आणि पुत्र होते त्या सर्वांनी राक्षस रुपात जन्म घेतला.
ते सर्व फार भयानक आणि सर्वांना दुःख देणारेच ठरले. ते पुलत्सय ऋषींच्या कुळात जन्माला आले. तीन भावांनी अनेक प्रकारच्या कठीण तपश्चर्या केल्या, ज्यांचे वर्णन देखील करता येणार नाही. तप पाहून प्रसन्न होऊन ब्रम्हदेव त्यांच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले 'मी प्रसन्न झालो आहे, वर माग.' रावणाने त्यांच्याकडून वर मागितला की वानर आणि मनुष्य सोडून कोणाच्याही हातून आम्हाला मरण येऊ नये.
भगवान शंकर म्हणतात की मी आणि ब्रम्हदेव दोघांनी मिळून त्याला वर दिला की तुम्ही फार मोठे तप केले आहे तेव्हा असेच होईल. मग ब्रम्हदेव कुंभकर्णाकडे गेले. त्याला पाहून त्यांना मनातून फार आश्चर्य वाटले. वाटले की या दुष्टाने रोज पोटभर भोजन केले तर साम्पौर्ण सृष्टीच उजाड होऊन जाईल. सरस्वतीने ब्रम्हदेवाच्या सांगण्यावरून त्याची बुद्धी फिरवली आणि त्याने ६ महिन्यांची झोप मागितली. मग ब्रम्हदेव बिभिशानाकडे गेले आणि म्हणाले की वर माग. त्याने भगवंताच्या चरणी निर्मळ प्रेम मागितले. त्याला वर देऊन ब्रम्हदेव तिथून निघून गेले.