Get it on Google Play
Download on the App Store

रावण ३१ बाणांनी मारला गेला होता

http://vijayagrawal.net/wp-content/uploads/Ram-Vs-Ravan-11.jpg

राम - रावण युद्द्धात जेव्हा रावणाचे सर्व योद्धे मारले गेले होते, तेव्हा रावण स्वतः श्रीरामाशी युद्ध करायला आपला दिव्य रथ आणि भयंक अस्त्र - शस्त्र यांनी सुसज्ज होऊन रणांगणात उतरला. रावणाने येताच अनेक प्रकारची माया अनेक वेळा रचली आणि वानर सेनेची हबेलदंडी उडवली. तेव्हा श्रीरामाने रावणाने रचलेली माया प्रत्येक वेळी निष्प्रभ करून वानर सेनेचे रक्षण केले.
मग जुएव्हा राम - रावण आमने सामने आले तेव्हा फार भयंकर युद्ध झाले. दोघांनीही दिव्य आणि प्रलयंकारी बाणांचे अनुसंधान करून एकमेकांवर सोडले. तेव्हा रामाने ३० शक्तिशाली बाण रावणाच्या दिशेने सोडले ज्यांनी रावणाची १० मस्तके आणि २० हात कापले गेले परंतु तरीही रावण मेला नाही, आणि त्याची सर्व तोंडे आणि हात पुन्हा आले. असे अनेक वेळा रामाने रावणावर बाण सोडले पण रावण मरतच नव्हता.
शेवटी बिभीषणाने रामाला सांगितले की रावणाच्या नाभीमध्ये अमृत आहे ज्यामुळे तो मरत नाहीये. तेव्हा रामाने ३१ बाणांचे संधान करून रावणावर सोडले. एक प्रमुख बाण रावणाच्या नाभीवर जाऊन लागला ज्याने तिथले सर्व अमृत संपवले, त्यापुढच्या १० बाणांनी रामानाची १० मस्तके आणि उरलेल्या २० बाणांनी रावणाचे २० हात कापले गेले आणि रावणाला मृत्यू प्राप्त झाला.