यमराजाचे वाहन रेडा
यम नामक एक वायू असतो. मृत्यू नंतर व्यक्ती त्या वायूमध्ये जाऊन स्थिर होतो आणि मग प्राकृतिक चक्रानुसार पुन्हा धरतीवर जन्म घेतो.
यम नावाच्या देवतेला मृत्यूची देवता म्हटले गेले आहे. त्याला दक्षिण दिशेचा दिक्पाल म्हटले जाते. यमराजाला रेड्यावर विराजमान म्हटले गेले आहे. रेडा एक सामाजिक प्राणी आहे. सर्व रेडे मिळून एकमेकांचे रक्षण करतात. हे एकतेचे प्रतिक आहे. रेडा आपली स्फूर्ती आणि शक्तीसाठी ओळखला जातो. रेडा आपल्या शक्तीचा कधीही दुरुपयोग करत नाही. तो आपले आत्मसंरक्षण करण्यासाठीच एखाद्यावर हल्ला करतो. रेड्याचे रूप ज्या प्रकारे भयानक असते त्याचप्रमाणे यामाराजाचे देखील रूप भयानक असते. म्हणून यमराज त्याला आपले वाहन म्हणून वापरतो.
व्यक्ती मृत्यू पावते तेव्हा सर्वांत आधी यमदुतांच्या हाती पडते, जे त्याला यमराजाच्या समोर उपस्थित करतात. यमराजाला दंड देण्याचा अधिकार प्राप्त आहे. तोच आत्म्याला त्याच्या कर्मानुसार नरक, स्वर्ग, पितृलोक इत्यादी लोकांत पाठवतो. त्यापैकी काहींना पुन्हा धरतीवर फेकून देण्यात येते.
विधाता (ईश्वर) लिहितो, चित्रगुप्त वाचतो, यमदूत पकडून आणतात आणि यमराज दंड देतो. मृत्यूची वेळच नाही तर स्थान देखील निश्चित असते जे कोणीही टाळू शकत नाही.