Get it on Google Play
Download on the App Store

भगवान विष्णूंचे वाहन गरुड

https://s-media-cache-ak0.pinimg.com/236x/07/e3/d7/07e3d7488cafb5f6f9bd446e7a360baf.jpg

गरुड प्रजाती आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. असे मानले जाते की गिधाडांची (गरुड) एक अशी प्रजाती होती जी अतिशय बुद्धिमान मानली जात होती आणि त्यांचे काम एका ठिकाणाहून दुसरीकडे संदेश पोचवण्याचे होते. प्राचीन काळातील कबुतरे देखील हे कार्य करत आली आहेत. भगवान विष्णूंचे वाहन आहे गरुड.
प्रजापती कश्यप यांची पत्नी विनता हिला दोन पुत्र झाले - गरुड आणि अरुण. गरुड विष्णूच्या चरणी निघून गेले आणि अरुण सूर्याचे सारथी झाले. संपाती आणि जटायू याच अरुणाचे पुत्र होते.
रामाच्या काळात संपाती आणि जटायू यांची खूप चर्चा होते. ते दोघेही दंडकारण्य क्षेत्रात राहत होते. विशेषकरून मध्यप्रदेश - छत्तीसगड मध्ये यांच्या जातीच्या पक्षांची संख्या विपुल प्रमाणात होती. छत्तीसगड मधील दंडकारण्यात गिधाडराज जटायूचे मंदिर आहे. स्थानिक मान्यतेनुसार दंडकारण्याच्या वरील आकाशातच रावण आणि जटायू यांचे युद्ध झाले होते आणि जटायूची काही अंग (शरीराचे काही भाग) दंडकारण्यात येऊन पडली होती, म्हणूनच इथे हे मंदिर आहे.
दुसरीकडे मध्यप्रदेशच्या देवास जिल्ह्यातील बागली तालुक्यात 'जटाशंकर' नावाचे एक स्थान आहे ज्याच्या बाबतीत असे म्हटले जाते की जटायू तिथे तपश्चर्या करत असे. जटायू असा पहिला पक्षी होता ज्याने प्रभू श्रीरामासाठी बलिदान केले. जटायूचा जन्म कुठे झाला ते माहिती झालेले नाही, परंतु त्याचा मृत्यू दंडकारण्यात झाला होता.