Get it on Google Play
Download on the App Store

कार्तिकेयाचे वाहन मयूर (मोर)

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/8/81/Murugan_by_Raja_Ravi_Varma.jpg/275px-Murugan_by_Raja_Ravi_Varma.jpg

मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. या पक्षाला जेवढे राष्ट्रीय महत्व आहे तेवढेच धार्मिक महत्व देखील आहे. हिंदू पौराणिक कथांनुसार भगवान कार्तिकेय यांचे वाहन मोर आहे.
एका मान्यतेनुसार अरबस्तानात राहणारे यजीदी समुदायाचे (कुर्द धर्म) लोक हिंदूच आहेत आणि त्यांची देवता कार्तिकेय आहे जो मोरावर विराजमान आहे. दक्षिण भारतात कार्तिकेयाची अधिक पूजा होते. कार्तिकेयाला स्कंद देखील म्हटले जाते, जो शंकराचा ज्येष्ठ पुत्र आहे.
कार्तिकेयाचे वाहन मोर आहे. एका कथेनुसार भगवान विष्णूने हे वाहन कार्तिकेयाला त्याची साधक क्षमता पाहून भेट दिले होते. मोराचे मन चंचल असते. चंचल मनाला साधणे खूप अवघड असते. कार्तिकेयाने आपले मन सोबत ठेवले होते. तिथेच एका अन्य कथेत याला दंभाचा नाशक म्हणून कार्तिकेयाच्या सोबत जोडले आहे.
संस्कृत भाषेत लिहिल्या गेलेल्या 'स्कंद पुराणा'चा तमिळ अनुवाद 'कांडा पुराणम' मध्ये उल्लेख आहे की देवासून संग्रामात शिवाचा पुत्र मुरुगन(कार्तिकेय) याने दानव तारक आणि त्याचे दोन भाऊ सिंहामुखम आणि सुरापदम्न यांना पराजित केले होते.
आपल्या पराजयावर सिंहामुखमने माफी मागितली तर मुरुगनने त्याला एक सिंह बनवला आणि आपली माता दुर्गा हिच्या वाहनाच्या रुपात तिची सेवा करण्याचा आदेश दिला.
दुसरीकडे मुरुगनशी लढताना सपापदम्न (सुरपदम) एका खडकाचे रूप घेतो. मुरुगन ने आपल्या भाल्याने त्या पहाडाला दोन भागांत तोडले. त्यातील एक हिस्सा मोर झाला जो कार्तिकेयाचे वाहन बनला. ही पौराणिक कथा सांगते की माता दुर्गा आणि तिचा पुत्र कार्तिकेय यांचे वाहन हे मुळात राक्षस आहेत ज्यांच्यावर कब्जा करण्यात आला आहे. अशा प्रकारे ते देवाकडून माफी मिळाल्यानंतर त्यांचे सेवक बनले.