भूमिका
आपल्या पवित्र पुराणांनुसार मकर संक्रांतीचे पर्व ब्रह्मा, विष्णु, महेश, गणेश, आद्यशक्ति आणि सूर्याची आराधना आणि उपासना यांचे पावन व्रत आहे, जे तन, मन आणि आत्म्याला शक्ती प्रदान करते. संत - महर्षी यांच्या नुसार याच्या प्रभावाने प्राण्याचा आत्मा शुद्ध होतो. संकल्प शक्ती वाढते. ज्ञान तंतू विकसित होतात. मकर संक्रांति हे याच चेतनेला विकसित करणारे पर्व आहे. संपूर्ण भारतात हे कोणत्या ना कोणत्या रुपात आयोजित होते.