Get it on Google Play
Download on the App Store

वंशावळ

अभ्यासकांमध्ये या भाषेच्या वंशावळीबद्दल वेगवेगळी मते आहेत: सी.वि.वैद्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिचा विकास/विस्तार संस्कृतपासून झाला तर स्टेन नोनाऊ यांनी तिचा विकास/विस्तार महाराष्ट्री अपभ्रंशापासून झाल्याचे म्हटले, तर इतर सर्व ती पंच द्रविड समूहातली एक मानतात. खैरेंना लेखी आणि बोली मराठीत तमिळमधले काही शब्द (अडगुळे-मडझुळे/ मडगुळे) आढळले. यादवांच्या काळात (११८०-१३२०) बोलल्या जाणाऱ्या मराठीत बरेच शब्द तेलगु(तूप, तळे) आणि कन्नड भाषेतून आदान केलेले होते. इसवीसन पूर्व १२९० च्या शतकात होयसाळाचे प्रधान पेरुस्माला अत मैलांगी यांनी “नागर,कन्नड,तेलुगु आणि मराठी शिकवण्यासाठी शिक्षकांची तरतूद” केली.(बी.ल्युईस राईस, म्हैसूर आणि कुर्ग, लेखावरून). शिवाजींच्या काळातील मराठीत पर्शिअन, अरेबिक, पोर्तुगीज आणि इंग्रजीतले अनेक शब्द आढळतात. महाराष्ट्र शब्दकोशात ( वाय.जी.दाते/य.ग दाते आणि सी.जी कर्वे/ च.ग.कर्वे यांनी संपादित केलेले आठ खंड) १,१२,१८९ शब्द आहेत, ज्यांपैकी पर्शिओ-अरेबिक शब्दसाठा २,९०० तर युरोपिअन शब्दसाठा १,५०० आहे. मराठीच्या लिखाणासाठी देवनागरी लिपीच वापरली जाते ज्यात जास्तीचा “ल” असतो, जुन्या मराठीची ऐतिहासिक कागदपत्रे मोडीलिपीत आढळतात. १६२२ साली फादर स्टीफन्स यांनी शुद्ध मराठीत ख्रिस्तपुराण लिहिले. काही मुसलमान लेखकांमुळे(सुफी संत शेख मुहम्मद) किंवा रेव. एन.वि.टिळक (१८५६-१९१९) ही भाषा अधिक सधन झाली.