Android app on Google Play

 

प्रादेशिक

 

मुंबई राजधानी असलेल्या पश्चिम भारतातील महाराष्ट्रात राहणाऱ्या पन्नास दशलक्ष लोकांची भाषा म्हणजे मराठी. पण महाराष्ट्र हे नाव रामायण किंवा महाभारतात आढळत नाही. सातव्या शतकात चिनी प्रवासी युआन च्वांग यांनी या भागाला मो-हा-ला-चो असे संबोधले होते. दहाव्या शतकात अल् बेरुनी यांनी मऱ्हाट्टा प्रदेश ठाणे या राजधानीसह नोंदवला होता. तोपर्यंत कोकण या प्रदेशात समाविष्ट नव्हते, सोपाराक हे त्याचं दुसरं नाव होतं( आधुनिक/आत्ताचं सोपारा, बंदर)..