Get it on Google Play
Download on the App Store

धृतराष्ट्र

http://infotainment.jagranjunction.com/files/2014/05/Dhritarashtra-in-Mahabharata.jpg

सत्यवतीला विचित्रवीर्य आणि चित्रांगद नावाचे दोन पुत्र झाले. चित्रांगद अल्पावस्थेतच मरण पावला तर दुसऱ्याचा विवाह काशी नरेशाच्या कन्या अंबिका आणि अंबालिका यांच्याशी करण्यात आला, परंतु त्यांच्यापासून विचित्रवीर्य याला अपत्य झाले नाही तेव्हा सत्यवतीने आपला पुत्र वेदव्यास याच्या माध्यमातून अंबिका आणि अंबालिका यांच्यापासून पुत्र उत्पन्न केले. अम्बिकाने धृतराष्ट्र आणि अंबालिकाने पंडू यांना जन्म दिला. त्याच दरम्यान सत्यवतीने एका दासीला देखील वेद्व्यासांशी नियोग करण्यास सांगितले ज्यापासून विदुर जन्माला आले.
पंडू शापामुळे जंगलात निघून गेला. त्यामुळे धृतराष्ट्राला सिंहासन मिळाले. वदंता आहे की गांधारीला धृतराष्ट्राशी विवाह करायचा नव्हता परंतु भीष्मांनी आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून तिचा विवाह धृतराष्ट्राशी लावला होता. मग एकदा विवाह झालाच म्हटल्यावर गांधारीने सर्व काही विसरून आपले जीवन पती सेवेमध्ये वाहून घेतले. जेव्हा गांधारी गर्भवती होती तेव्हा धृतराष्ट्राने आपल्याच एका दासीसोबत सहवास केला ज्यापासून त्याला युयुत्सु नावाचा पुत्र झाला.
गांधारीने खूप समजावून देखील धृतराष्ट्राने गांधारीचे पिता आणि त्याचा संपूर्ण परिवार यांना आजीवन कारावासात टाकले होते.
वयोवृद्ध आणि ज्ञानी असून देखील धृतराष्ट्राच्या मुखातून कधीही न्याय्य गोष्ट बाहेर पडली नाही. पुत्रामोहाने त्याने कधीही गांधारीच्या न्याय्य सांगण्याकडे लक्ष दिले नाही. गांधारीच्या व्यतिरिक्त संजय देखील त्याला न्याय्य गोष्टी समजावून सांगून राज्य आणि धर्माच्या हिताच्या गोष्टी सांगत असे, परंतु तो त्याचेही ऐकत नसे. तो नेहमी दुर्योधन आणि शकुनी यांच्याच गोष्टी सत्य मानत असे. त्याला माहिती होते की ते दोघे अधर्म आणि अन्याय करत आहेत, परंतु तो तरीही पुत्राचीच साथ देत असे.