Get it on Google Play
Download on the App Store

भीष्म

https://pbs.twimg.com/profile_images/647295877237747712/odwFdfTx.jpg

शांतनु सत्यवतीचे रूप आणि सौंदर्याने मुग्ध होऊन तिच्यावर प्रेम करू लागले होते आणि त्यांना तिच्याशी विवाह करायचा होता परंतु सत्यवतीने त्यांच्यासमोर अशी अट ठेवली होती जी ते पूर्ण करू शकत नव्हते. त्यामुळे ते दुःखी आणि उदास राहत असत. जेव्हा भीष्मांना याचे कारण लक्षात आले तेव्हा त्यांनी सत्यवतीची अट मान्य केली आणि आपले पिता शांतनू यांचा विवाह सत्यवतीशी करून दिला होता. सत्यवतीमुळेच भीष्मांना आजीवन ब्रम्हचारी राहण्याची शपथ घ्यावी लागली होती.
सत्यवतीच्या सांगण्यावरून भीष्मांनी कशी नारेशाच्या ३ कन्या अम्बा, अम्बालिका आणि अम्बिका यांचे अपहरण केले होते. नंतर अम्बाला सोडून सत्यवतीचा पुत्र विचित्रवीर्य याच्याशी अम्बालिका आणि अंबिका यांचा विवाह केला होता.
गांधारी आणि तिचे पिता सुबाल यांच्या इच्छेविरुद्ध भीष्मांनी गांधारीचा विवाह धृतराष्ट्राशी करून दिला होता. मानले जाते की म्हणूनच गांधारीने आपल्या डोळ्यांवर देखील पट्टी बांधून घेतली होती. आणि शेवटी गांधारीला दावाग्नी मध्ये जळून स्वतःच्या प्राणांचा शेवट करावा लागला होता.
भर दरबारात जेव्हा द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रयत्न झाला तेव्हा भीष्म गप्प बसून होते. भीष्मांनी जाणून बुजून शकुनी आणि दुर्योधन यांचा अनैतिक आणि कपटपूर्ण खेळ चालू दिला होता. शरशैयेवर जेव्हा भीष्म मृत्यूची प्रतीक्षा करत होते तेव्हा त्यांनी या गोष्टीसाठी द्रौपदीची क्षमा देखील मागितली होती. जेव्हा कौरवांची सेना जिंकत होती तेव्हा भीष्मांनी ऐन वेळी पांडवांना आपल्या मृत्यूचे रहस्य सांगून कौरवांना धोका दिला होता. तरी देखील भीष्मांना खलनायक मानता येत नाही कारण त्यांनी जे काही केले ते हस्तिनापूरचे सिंहासन आणि कुरुवंशाच्या रक्षणासाठी केले होते.