Android app on Google Play

 

एरी कॅनॉल

 

एरी कॅनाल हा उत्तर अमेरिकेतील एक मानवनिर्मित जलप्रवाह आहे. तो बांधण्याचा हेतु माल आणि प्रवासी वाहतूक हा होता. थोडाथोडका नव्हे तर तब्बल ३६३ मैल लांबीचा हा कालवा एरी सरोवराच्या काठावरील बफेलो शहरापासून निघून हडसन नदीच्या काठावरील अल्बनी शहरापर्यंत जातो. १८१७ पासून १८३२ पर्यंत याचे काम चालले पण १८२५ पासून टप्प्याटप्प्याने हा वाहतुकीस खुला झाला. म्हणजे भारतात पेशवाई बुडाल्याचा हा काळ आहे! हे सर्व वाचताना मला प्रथमच जाणवले कीं आपल्याला हे सर्व नवीन आहे. आपल्या माहितीत म्हणजे, कालवे हे नदी वा सरोवराचे पाणी शेतीला वा पिण्यासाठी पुरवण्यासाठी असतात! ते आपल्याकडेहि फार जुन्या काळापासून होते आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर मोठमोठीं धरणे व कालवे आपल्या समोरच बनले. काही थोडेच कालवे वीज निर्मितीसाठी पाणी वाहून नेण्यासाठीहि बनलेले आपल्याला माहितीत असतात पण माल वा प्रवासी वाहतुकीसाठी मानवाने बनवलेला कालवा भारतात एकहि मला माहीत नाही. चूकभूल माफ.पण मग असा कालवा बनवण्याची कल्पना कोणाला व अचानक कशी सुचली?
असे अचानक क्वचितच होते, बहुधा काहीतरी पूर्वपीठिका असतेच. पनामा कालवा बांधताना सुएझ कालव्याची पीठिका होती कीं? मग मला प्रश्न पडला कीं सुएझ कालवा बांधताना कोणती पीठिका होती?