जगभरात रामावर लिहिले गेले सर्वांत जास्त ग्रंथ
"रामायण" हा वाल्मिकींनी रामाच्या काळातच लिहिला होता, त्यामुळे या ग्रंथाला सर्वांत प्रामाणिक ग्रंथ मानले जाते. हा मूळ संस्कृत मध्ये लिहिला गेलेला ग्रंथ आहे. "रामचरित मानस" ग्रंथ गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिला ज्यांचा जन्म १५५४ ला झाला होता. तुलसीदासांनी रामचरित मानस ची रचना अवधी भाषेत केली.
तमिळ भाषेत कम्बन रामायण, आसाम मध्ये आसामी रामायण, उडीया मध्ये विलंका रामायण, कन्नड मध्ये पंप रामायण, कश्मीर मध्ये कश्मीरी रामायण, बंगाली मध्ये रामायण पांचाली, मराठी मध्ये भावार्थ रामायण.
कंपूचिया चे रामकेर्ति किंवा रिआमकेर रामायण, लाओस फ्रलक-फ्रलाम (रामजातक), मलेशिया चे हिकायत सेरीराम, थाईलैंड चे रामकियेन आणि नेपाल मध्ये भानुभक्त कृत रामायण आदि प्रचलित आहेत. यांच्या व्यतिरिक्त देखिल अन्य कित्येक देशांमध्ये त्यांच्या त्यांच्या भाषेत रामायण लिहिले गेले आहे.