Get it on Google Play
Download on the App Store

राजा राम की भगवंत

http://3.bp.blogspot.com/-jpJQm04kwGo/TrQk7WMv8WI/AAAAAAAAAQQ/LSMI9V0dTIk/s1600/shri+ram+Arya+samaj+jhansi.jpg

हिंदू धर्मावरील टीकाकार विशेष करून रामाची निंदा नालस्ती करतातच कारण त्यांना माहिती आहे की राम हाच हिंदू धर्माचा सर्वांत भक्कम आधारस्तंभ आहे. जर हा स्तंभ जमीनदोस्त करता आला तर हिंदूंना भ्रष्ट करणे आणि त्यांचे धर्मांतरण सोपे होऊन जाईल. या नीतीला अनुसरून तथाकथित धर्मनिरपेक्ष शक्तींच्या साथीने रामाला एक सामान्य पुरुष म्हणून घोषित करण्याचे कारस्थान नेहमी होत आले आहे. ते म्हणतात की राम कोणी देव वगैरे नव्हता, तो केवळ एक राजा होता. त्याने समाज आणि धर्मासाठी काय केले? तो केवळ आपल्या स्त्री साठी रावणाशी लढला आणि तिला त्याच्या तावडीतून मुक्त करून घेऊन आला. त्यावरून तो देव कसा झाला?
प्रभू श्रीरामाला 'मर्यादा पुरुषोत्तम' म्हटले गेले आहे, म्हणजे पुरुषांतील सर्वांत श्रेष्ठ उत्तम पुरुष. आपल्या वनवासाच्या दरम्यान त्याने देशातील सर्व आदिवासी आणि दलितांना संगठित करण्याचे कार्य केले आणि त्यांना जीवन जगण्याची दीक्षा दिली. या दरम्याने ते स्वतः अगदी साधे सामान्य जीवन जगले. त्याने देशातील सर्व संतांच्या आश्रमांना बर्बर लोकांच्या आक्रमणापासून वाचवले. याचे प्रमाण केवळ रामायणातच नाही, तर देशभरात विखरून पडलेल्या साक्ष्यांमध्ये देखील सहज उपलब्ध आहे.
१४ वर्षांच्या वनवासातील पहिली १२ वर्षे रामाने भारतातील आदिवासी आणि दलित यांना भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा भरपूर प्रयत्न केला. सुरुवात होते केवट प्रसंगाने. यानंतर चित्रकुटात राहून त्याने धर्म आणि कर्म यांचे शिक्षण आणि दीक्षा घेतली. इथेच वाल्मिकी आश्रम आणि मांडव्य आश्रम होता. इथूनच रामाचा भाऊ भरत त्याच्या पादुका घेऊन गेला होता. चित्रकुटाच्या जवळच सतना मध्ये अत्री ऋषींचा आश्रम होता.

जेव्हा कोणीही अवतार घेते तेव्हा त्याची काही चिन्ह किंवा लक्षणे दिसतात आणि तो अवतार आहे याची ग्वाही देणारे कोणीतरी असतेच. रामाने जेव्हा जन्म घेतला तेव्हा त्याच्या पायांवर कमळाचे फूल कोरलेले होते, जसे कृष्णाच्या पायांवर होते. रामाच्या सोबत हनुमानासारख्या सर्वशक्तिमान देवाचे होणे या गोष्टीची सूचना आहे की राम हा देव होता. रावणासारखा विद्वान आणि मायावी एखाद्या सामन्याच्या हातून मारला जाऊ शकला असता का? हे सर्व सोडून दिले तरीही ब्रम्हर्षी वसिष्ठ आणि विश्वामित्र यांनी या गोष्टीची पुष्टी केली की राम कोणी सामान्य पुरुष नाही, तर तो देव आहे, आणि तेही भगवान विष्णूंचा अवतार. इक्ष्वाकू वंशात एक नव्हे तर अनेक देवतांनी अवतार घेतले, ज्यांच्यापैकी सर्वांत पहिले नाव आहे ऋषभनाथ, जे जैन धर्माचे तीर्थंकर होते.